तभा फ्लॅश न्यूज/ सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे तीन दिवस पंढरपूर मुक्कामी होते. एखादे पालकमंत्री मुक्कामी थांबून वारी नियोजन पाहणं ही पाहिलीच वेळ आहे. म्हणून भाविक वारकरी मंडळ यांचे वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सुधाकर इंगळे महाराज राष्ट्रीय अध्यक्ष यांनी शॉल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
आषाढी वारी ही महाराष्ट्र राज्याचे भूषण असून संस्कृतीक चळवळ आहे. ” पंढरीची वारी आहे माझे घरी | आणिक न करी तीर्थ व्रत || ” या संत उक्ती प्रमाणे प्रत्येक वारकरी हा आषाढी एकादशीला पंढरपूरला येत असतो. वारकरी हा कुठलीच व्यवस्था न पाहता वारी करतो. सर्व वारकरी निष्ठेने वारी करतात. पाऊस लवकर व जास्त प्रमाणात झाल्यामुळे या 2025च्या आषाढी वारीसाठी यंदा भाविकाची 27 लाख ही सर्वोच्च संख्या होती. ही संख्या इतकी मोठी असताना सुद्धा कुठला ही अनर्थ घडला नाही. कारण यंदा पंढरीमध्ये व्यवस्थापन अतिशय चांगलं होत.पाणी पुरवठा, पोलीस प्रशासन, स्वच्छता, गर्दी वरील नियंत्रण, आरोग्य सेवा, टॉयलेट, हिरकणी कक्ष, वाळवंट स्वच्छता, इ. असे अनेक निर्णय योग्य वेळेत घेतले गेले म्हणून वारी यशस्वी करता आली.
या प्रसंगी मनिष केत प्रदेश अध्यक्ष, संजय पवार, शहर अध्यक्ष, सचिन भोसले, अनिकेत जांभळे, गुरुसिद्ध गायकवाड, अनिकेत भोसले इ. पदाधिकारी उपस्थित होते.