जिंतूर / परभणी – तालुक्यातील आडगाव बाजार येथील 33 केवी वीज केंद्र वर जास्त लोड येत असल्यामुळे परिसरातील सर्व शेतकऱ्यांना वारंवार होणाऱ्या ट्रीप मुळे व कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने शेती चे अतोनात नुकसान होत होते व शेतकऱ्याचे हाल होत होते.
यावर अनेक वेळा प्रश्न उचलून देखील परिस्थितीत कोणताच बदलना झाल्यामुळे आडगाव बाजार येथील चेअरमन प्रल्हाद रामकिशनराव दाभाडे यांनी शासनाला आडगाव बाजार येथील तेहतीस किवी वर एक नवीन अकरा किवीचा डीपी लावण्याची मागणी केली होती परंतु या प्रश्नाकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी 11 केवीसाठी आत्मदहनाचा इशारा दिला परंतु शासनाने हस्तक्षेप करून एका वर्षात प्रश्न मार्गी काढतो म्हणून 2024 रोजी आत्मदहनाचा इशारा देऊन सर्व जनतेसमोर व शेतकऱ्यांसमोर 33 केवी वर आत्मदान करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासनाने मध्यस्थी करून लेखी स्वरुपात मागणी मांडणी केली व लवकरच 11 केवी मंजूर करण्यात येईल असे लेखी स्वरूपात आश्वासन दिले त्यानंतर आत्मदहन थांबविण्यात आले.
दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी प्रशासनाने 11 केवी मंजूर करून डीपी आडगाव बाजार येथे 33kv वर आणण्यात आला आज प्रल्हाद दाभाडे यांनी केलेले अतक परिश्रमातून 11 केवी आडगावला आल्यामुळे परिसरातील सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे दाभाडे यांनी केलेले आत्मदहन इशारा यश प्राप्त झाल्याची सर्वत्र चर्चा आहे आडगाव येथील शनिवारी दुपारी ते तिसगाव डीपी बसवण्यात आला आहे.
या डीपी बसवल्यामुळे आडगाव बाजार येथील नागरिकांनी पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचे आभार मानले व तसेच गावातील नागरिक प्रलाद दाभाडे यांची सुद्धा आभार मानले.


















