माळशिरस : शहर व परिसरात मराठी नवीन वर्षाचा सण गुढीपाडवा उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला प्रभू राम रावणाचा पराभव करून परत आल्यानंतर सर्वांनी आपल्या दारात गुढ्या उभारून प्रभू रामाचे स्वागत केले होते.आजही हा गुढीपाडवा सण सर्वत्र साजरा केला जातो .या सणासाठी प्रत्येक घरासमोर गुढी उभारून गुढीची पूजा करून गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून साखरेची हारगाठी घालून हा सण साजरा केला जातो. या सणासाठी साखरेच्या हार गाठीला फार महत्त्व आहे. गुढीपाडवा सणामुळे आज ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेसाठी जाणाऱ्या कावडी यात्रेची सुरुवात आज झाली. शहरातील अनेक कावडींनी आज वाजत गाजत मिरवणूक काढून ग्रामदैवत श्रीराम , हनुमान व महादेव मंदिरात पाण्याची धार घालून व कावडी यात्रेची सुरुवात केली.
गुढीपाडवा सणासाठी लागणाऱ्या साखरेच्या हार गाठी व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी गेले दोन दिवस शहरातील किराणा दुकानात नागरिकांनी गर्दी दिसत होती तसेच गुढीला व आपल्या दुकानांना,वाहनांना घालण्यासाठी झेंडू चे हार घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती .


























