सोयगाव / संभाजीनगर – अजिंठा शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या रेड रिबन क्लब अंतर्गत एड्स दिनानिमित्त एड्स व थॅलेसेमिया बद्दल मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथील समुपदेशक सुनील वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना एड्स बद्दल समुपदेशन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही बद्दल माहिती सांगितली. तसेच विद्यार्थ्यांचे एचआयव्ही बद्दलचे गैरसमज दूर केले. . त्यांच्या समवेत समुपदेशक अतुल मुळे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.रावसाहेब बारोटे यांनी विद्यार्थ्यांना एड्स बद्दल सखोल मार्गदर्शन केले.व ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथील डॉ. अनिकेत घोडके यांनी विद्यार्थ्यांना थॅलेसेमिया या आजाराबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार यांनी विद्यार्थ्यांना दोन्ही आजाराबद्दल सखोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पवार,उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे,कनिष्ठ विभाग प्रमुख डॉ.उल्हास पाटील,प्रा.अनिल मानकर,डॉ. ग्यानबा भगत, महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.निलेश गावडे यांनी केले. तर डॉ.निलेश गाडेकर यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक,कार्यक्रमाधिकारी डॉ.निलेश गावडे,डॉ.पंकज गावित,डॉ.सुनील चौधरे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सोबत फोटो –























