जेऊर – शेटफळ विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ज्ञानदेव मच्छिंद्र पोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तेरा सदस्य असलेल्या या सोसायटीचे चेअरमन अंगद पोळ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर सर्व सदस्यांमधून ज्ञानदेव मच्छिंद्र पोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली करमाळा तालुका उपनिबंधक कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बहुमताने त्यांची निवड करण्यात आली.
यावेळी सहाय्यक निबंधक कार्यालयातील ए.एस .महानवर व सचिव लक्ष्मण थोरात यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले यावेळी बाजार समितीचे माजी संचालक दादासाहेब लबडे मनोहर पोळ सुधिर पोळसोसायटी सदस्य विलास पाटील तुकाराम नाईकनवरे बळीराम लबडे अंगद पोळ भाऊसाहेब साबळे माजी सरपंच विकास गुंड पांडुरंग लबडे, काकासाहेब गुंड, तुकाराम चोरगेपांडुरंग कळसाईत, नंदकुमार सव्वालाख , अशोक पोळ, सुभाष घोगरे , बळीराम पोळ सतीश पोळ उपसरपंच शिवाजी पोळ विजयपूर राजेंद्र नाईकनवरे बापूराव गुंड अण्णासाहेब पाटील निलेश गायकवाड राजेंद्र पोळ विशाल पोळ विठ्ठल गुंड राजेश पोळ अमोल पोळ राहुल लबडे चेतन पोळ सचिन पोळ सुहास पोळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते


























