पंढरपूर – श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिराला १४ जानेवारी २०१४ ला कायदेशीर मार्गाने मुक्ती मिळाली. वारकरी लोकांच्या ताब्यात श्रीविठ्ठल मंदिर आले याचा आनंद आहे, त्याची आठवण म्हणून श्रीविठ्ठल रूखमाई आंदोलनाच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यात येत आहेत असे प्रतिपादन ह.भ.प.डॉ.सुहास महाराज फडतरे यांनी केले.
श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरासमोर संत नामदेव पायरी याठिकाणी श्रीविठ्ठल रूखुमाई मुक्तीदिन साजरा करण्यात आला. दरम्यान सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भजन करीत श्रीविठ्ठल रूक्मिणीमातेचे दर्शन घेत संत नामदेव पायरी येथे आरती करण्यात आली. आरतीनंतर याठिकाणी लाडू प्रसाद वाटप करण्यात आला.
यावेळी बोलताना श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट म्हणाले, श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने पहिल्यांदा हा दिवस परिवर्तन दिवस म्हणून साजरा केला. मात्र, दुसऱ्या वर्षी ही परंपरा खंडीत झाली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा वारकरी, विठ्ठल भक्तांसाठी हा ऐतिहासिक निर्णय होता. मात्र, श्रमिक मुक्ती दलाने ही परंपरा कायम ठेवण्याच्या उद्देशाने आज १७ जानेवारी रोजी श्रीविठ्ठल रूखमाई मुक्तीदिन आम्ही साजरा करीत असताना यंदाच्या वर्षी संत नामदेव महाराज पायरीजवळ विठ्ठल भक्तांना लाडू वाटप केले आहे.
————————–
याची होती उपस्थिती
श्रीविठ्ठल रूखुमाई मुक्तीदिन साजरा करते वेळी संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य किरण घाडगे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बागल, श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट, विवेक पाटील, भगवान महाराज बागल, संदीप मांडवे, सुधाकर कवडे, शेखर आटकळे, स्वप्निल गायकवाड, गोरख बागल, छगन कांबळे, महादेव सावंत, तुकाराम जाधव, हेमंत देवकर, शिवाजी रेडे, किरण कत्रे, आकाश मांडवे आदी उपस्थित होते.
















