हदगांव / नांदेड – हदगाव नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पद हे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जात असून नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गातील महिलासाठी राखीव आहे त्यामुळे आज सर्व प्रमुख पक्षातील प्रत्येकी दोन महिलांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज नगराध्यक्ष पदासाठी महिलांनी एकूण १६ उमेदवारी अर्ज दाखल केले. तर नगरसेवक पदासाठी आज एकूण १३९ नामनिर्देशन पत्र दाखल केले.
आज शिवसेना (शिंदे) कडून माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या सुन रोहीणी भास्कर वानखेडे, शिवसेना (उबाठा) कडून प्रसिद्ध व्यापारी बालाजी घाळाप्पा यांच्या पत्नी सिमा घाळाप्पा, माजी नगरसेवक वसंतराव देशमुख यांच्या पत्नी वर्षाताई वसंतराव देशमुख यांचे तर काल कॉंग्रेस पक्षाकडून माजी उपनगराध्यक्ष सुनील सोनुले यांच्या पत्नी कुमुद सुनील सोनुले, व वंचित बहुजन आघाडी कडून चाऊस अफशन इराम जाकीर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या सुरुवातीच्या दिवसापासून ते आज शेवटच्या दिवसापर्यंत हदगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी एकूण २१ नामनिर्देशन पत्र व नगरसेवक पदासाठी १८२ नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत.


















