वेळापूर – येथील लोकविकास शिक्षण प्रसारक संस्थेच्या मराठी मिडियम व इंग्लिश मिडियम स्कूल, लोकविकास जुनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मोनाली माने-जाधव ,शमा तांबोळी ,सुर्वणा टिक,सोनाली नवले,रूपाली बनकर, सुरेखा कुदळे,,यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या वेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध हस्तकला व वैज्ञानिक अविष्कारांचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच मातापालकांसाठी संगीत खुर्ची व उखाणे स्पर्धा या मनोरंजक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. संगित खुर्ची मध्ये वैशाली कांबळे, रूपाली काटकर, रूपाली बनकर,उखाणे स्पर्धे मध्ये,शैला पताळे ,शमा तांबोळी,अनुराधा चंदनशिव, यांनी नंबर मिळवले. कार्यक्रमास मातापालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक अमोल पांढरे, अजित बनकर, सुनिल पताळे, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया चापले प्रस्तावना अरुणा बनसोडे व आभार प्रदर्शन प्रियंका अनंतकवळस यांनी केले.

















