भोकरदन : अपंग जनता दल सामाजिक संघटनाच्या वतीने भोकरदन तालुक्यातील दिव्यांग अपंगानी ता. 20 मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान भोकरदन येथील तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन केले आहे, विविध मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला , यावेळी दिव्यांग अपंगाच्या वतीने जोरदार घोषणा करून शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला असून तहशिलदार संतोष बनकर यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे,
दरम्यान या निवेदनात म्हटले आहे की भोकरदन तालुक्यातील अपंग, तसेच दिव्यांग बांधवांना तहसील कार्यालयात विविध शासकीय कामासाठी वेळोवेळी हेलपट्या माराव्या लागत असून येथील शासकीय कर्मचारी आमचे वेळेवर कामे न करता आम्हाला उडवाउडवीचे उत्तर देतात तसेच आमच्या मागण्या पूर्ण करीत नाही, असा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे, या आंदोलना मध्ये औरंगाबाद विभागीय नूर चौधरी, जिल्हाध्यक्ष आशोक भोसले, तालुकाध्यक्ष नारायण पंडीत, राजू पवार, महादू सपकाळ,जबर तडवी,अनिल निकाळजे,नाशिर शेख,राजू फुसे, सुधाकर,दुतोंडे,बाळा गवळी संभाजी बोरकर यांच्यासह दिव्यांग अपंग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,
काय आहे अपंग दिव्यांगाच्या मागण्या
दिव्यांग बांघचाच्या पत्नींना कामगार पावती रिन्युअल करण्यासाठी सही शिक्के देण्याचे ग्रामसेवक यांना आदेशीत करणे,
अपंग दिव्यांगांना शबरी आवास योजने अंतर्गत अडीच लाख रुपये पर्यंतचे घरकुल देण्यात यावे. त्यासाठी ठराव पारीत करण्यात यावा,
दिव्यांग बांधवाना शासना च्या निर्णयानुसार घरपट्टी माफ करण्यात यावी,
विव्यांगासाठी दारिद्र रेषेचे कार्ड देण्यात यावे,
दिष्यांगाना 5% निधी पुढील 15 दिवसात वितरीत करण्यात यावे, दिव्यांगना शासानाचे नियमानुसार स्कुटस्चे वाटप करण्यात यावे,
शहरातील दिव्यांगांचे घरपट्टी भाफ करण्यात यावी दिव्यांगाना चालु असलेले मानधन त्यांना वेळेवर मिळत नाही करीता त्यासाठी पाठपुरावा करून दिव्यांगना वेळेवर त्यांचे मानधन देण्याचे आदेशीत करावे,
दिव्यांगनी समाजकल्याण विभागाचे लोण घेतलेले असून, त्यासाठी यांच्या लोणवर व्याज लावून, त्यांना नोटीस बजावुन त्यांचे अवहेलना करणे ताबडतोब थांबविण्याचे आदेशित करावे, या सर्व सदरील मागण्या पंधरा दिवसाच्या आत मान्य न झाल्यास अथवा कोणत्याही प्रकारची कार्यवाही न इाल्यास, येत्या पंधरा दिवसात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दिव्यांग अपंगाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे,