सोलापूर – हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून ३३ वर्षे सेवा बजावून भानुदास इरशेट्टी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवागौरव समारंभात शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्या दीपा फाटक यांच्या हस्ते शाल, मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश पाटील यांनी तर मानपत्र वाचन धन्यकुमार बिराजदार यांनी केले. शिक्षक-शिक्षिका आणि कार्यालयीन प्रमुख रत्नाकर लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी उपप्राचार्य शांतप्पा कुंभार, भानुदास बनसोडे, अप्पासाहेब राऊत, औदुंबर सर्वगोड, महेंद्र रणधीर, मारुती शहाणे तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन उर्मिला चव्हाण यांनी, तर आभार प्रदर्शन सारिका अनपट यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल महारुद्र कत्ते आणि चित्रकला शिक्षक रोणे यांनी परिश्रम घेतले. इरशेट्टी यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















