उमरी / नांदेड – उमरी तालुक्यातील सिंधी गावा जवळ दि ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ः ४५ ते २ वाजेच्या सुमारास उमरी – सिंधी ते मुदखेड रोडवरील सिंधी कॅनलच्या पुलावर हायवाने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पुढून येणाऱ्या दुचाकीला धक्का दिला असता एक महिला ठार तर दुचाकीस्वार तिचा मुलगा होता तो किरकोळ जखमी झाला होता.
दुचाकी क्र. TS-18-E-2843 हे वाहन मुदखेड कडून उमरी कडे येत असताना उमरी कडून मुदखेड कडे येणारा हायवा क्र. MH-26-AD-1838 हे ट्रॅक्टरला ओव्हरटेक करतांना दुचाकीला धक्का दिल्याने काही कळायच्या आतच दुचाकी चालवणारा मुलगा रोडच्या खाली पडला तर दुचाकीवरील मागे बसलेली महिला ही रोडवर पडल्याने हायवाच्या चाकात आल्याने तिचा मृत्यू तर दुचाकी चालवणारा मुलगा हा किरकोळ जखमी झाला होता.
अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून घटनेची माहिती मिळताच उमरी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली यात मृतदेह व वाहने ताब्यात घेतली असून पुढील आवश्यक ती कारवाई सुरू आहे, मयत महिला ही करखेली येथील रहिवाशी असल्याचे समजते असून तीचे आडनाव हेमके असल्याचे निष्पन्न झाले आहे.
यावर वाहन चालकाची चालण्यावर नियंत्रण राहिलेले नाही म्हणून अशा घटना घडत असल्याचे जोरदार चर्चा होत आहे . पुढील तपास वेगाने सुरु आहे .






















