▪️२०१४ मध्ये भाजपला अचानक यश मिळालं नाही, वाजपेयी, अडवाणींनी खस्ता खाल्या- राज ठाकरे
▪️मला कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, दुसऱ्याची पोरं फिरवायचं सुख नको, राज ठाकरेंची फटकेबाजी
▪️काँग्रेसने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली; 39 उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
▪️खलिस्तानी अमृतपाल सिंगच्या सुरक्षेत मोठी चूक, थेट अधीक्षकांना अटक; UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
▪️बँक कर्मचाऱ्यांना 17 टक्के पगारवाढ देणाऱ्या करारावर अंतिम स्वाक्षऱ्या, सात लाख कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार
▪️समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरला थेट पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी
▪️औरंगाबादच्या नादात ‘दौलताबाद’ नावावर छत्रपती संभाजीनगरचं स्टिकर, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा कारनामा!
▪️सोलापुरात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चोरीचे प्रमाण वाढत असून जनावरांची चोरी तथा तस्करी करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई केली जाणार
▪️उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला दिनी मोठा निर्णय जाहीर केला; यापुढे फडणवीसांच्या नावात आईचं नावही वडिलांच्या नावासोबत लागणार
▪️पुणे – अहमदनगर – संभाजीनगर अशा 230 किलोमीटर लांबीच्या सिक्स लेन ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे साठीचा सामंजस्य करार नागपुरात पार
▪️साईबाबांच्या चरणी शाळेच्या इमारतीच्या स्वरुपात 75 लाखांचं दान; बंगळुरुच्या माकम कुटुंबियांनी शिर्डीत शाळेची इमारत बांधून साईबाबांना दान केलं