तामसा / नांदेड – तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी बालाजी गंगातीर यांची निळा(ता. नांदेड) प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करीत निरोप देण्यात आला.
गंगातीर यांनी येथे २६ वर्ष सेवाकाळात आरोग्य कर्तव्यासह वृक्षारोपण,स्वच्छता,सामाजिक, राष्ट्रीय उपक्रमात लक्षणीय कार्य केले. कोरोना काळातील सेवेबद्दल त्यांना सन्मानित केले होते. येथील शासकीय आयुर्वेदिक दवाखान्यात जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सत्यनारायण मुरमुरे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे,वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास बोंदरवाड, डॉ. मोहिनी सूर्यवंशी यांच्या हस्ते बालाजी गंगातीर यांचा बदलीनिमित्त सत्कार करण्यात आला.
तसेच तामसा येथील सरपंच आनंदराव घंटलवार भाजपचे शहराध्यक्ष शिवराज वारकड यांनी गंगातीर यांचा सत्कार केला. यावेळी गंगाधर जुन्या आठवणींना उजाळा देताना भावुक झाले होते. सत्कार समयी मान्यवरांनी गंगातीरी यांच्या सेवाकाळाचा गौरव केला.



















