भोकर – डाॅ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती संचालकाची दि.३० रोजी सभा आयोजीत करण्यात आली होती.
यावेळी सभापती उपसभापती सह सोळा संचालकांची उपस्थिती होती सभेपूढिल विषय घेण्यापूर्वी उपमूख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघाताने दूर्देवी निधन झाल्यामूळे बाजार समितीचे संचालक रामचंद्र मूसळे यांनी आपल्या मनोगतात अजित दादा सारखा नेता महाराष्ट्रात यापूढे होणे शक्य नाही असे म्हणाले संचालक विश्वांभर पवार यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आनावर झाले दादाच्या अशिर्वादामूळेच बाजार समितीमध्ये आलो व दादाच्या आशिर्वादानेच आज मी उभा आहे अशी भावना व्यक्त केली.
बाजार समितीचे सभापती जगदिश पाटील भोसीकर यांनी देखील दादाबद्यल मनोगत व्यक्त करताना म्हणाले की दादा कोणत्याही पक्षाचे असो त्यांचे भाषण ऐकण्यात फार आनंद होत होता वैचारीक बोलत होते असे म्हणाले यावेळी बाजार समितीचे सर्व संचालक सर्व कर्मचारी उपस्थित राहून कै.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहीली.

























