लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात 21 राज्यांमधील 102 जागांसाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यातील महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात मतदानासाठी हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले आहेत.
छत्तीसगडमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदान पथके विजापूरमध्ये हेलिकॉप्टरने नक्षलग्रस्त भागात रवाना होत आहेत. छत्तीसगडमधील लोकसभेच्या 11 जागांवर 19 एप्रिल, 26 एप्रिल आणि 7 मे रोजी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. बस्तर ही एकमेव जागा आहे जिथे पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासोबतच महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात देखील शुक्रवारी 19 रोजी मतदान होणार आहे.