सोलापूर – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने श्री सिद्धेश्वर कृषी उत्त्पन्न बाजार समिती यांच्या वतीने २५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सभापती दिलीप माने, संचालक मंडळाच्या समवेत सुपूर्द करण्यात आला.
सोलापूर मुंबई विमान सवेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर आले असता, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हा सकारात्मक निर्णय घेण्यात आला. या निधीमुळे राज्यातील बाधित शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, बाजार समितीचे सभापती दिलीप माने, उपसभापती सुनील कळके, संचालक राष्ट्रीयखर शिवदारे, सुरेश हसापुरे, श्रीशैल नरोळे, प्रथमेश पाटील, आदींसह सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते.