देगलूर -अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयात शिख धर्माचे ९ वे गुरू श्री गुरु तेग बहाद्दूर यांच्या ३५०व्या शहीदी शताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
आज राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहात
“श्रीगुरु तेगबहादुर साहिबजी यांचे जीवन व कार्य” या विषयावर डॉ किशन सुनेवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ उपस्थित होते तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. ए. बी. चिद्रावार, डॉ. एम एम पटेल, पर्यवेक्षक संग्राम पाटील कार्यक्रमाधिकारी डॉ संजय देबडे कार्यक्रमाधिकारी डॉ व्यंकट खांदकुरे प्रा गणेश क्यादारे प्रा शिवचरण गुरुडे स्वयंशासन दिनाचे प्राचार्य कु. वारे श्रीदेवी यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते, अशी माहिती प्रसिद्धीप्रमुख डॉ. बी. आर. कतुरवार यांनी दिली आहे.


















