Friday, August 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माहूर येथे व्यापारी संकुल व वाहनतळासाठी २० कोटींचा निधी, शासनाचे आभार – आ. केराम

तरुण भारतbyतरुण भारत
January 20, 2026
in marathwada
0
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माहूर – केंद्र शासनाच्या “भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना २०२५-२६” या प्रस्तावित योजनेंतर्गत माहूर नगरपंचायत अंतर्गत मंजूर विकास आराखड्यानुसार शहरातील ‘व्यापारी संकुल व वाहनतळ विकसित करणे’ यासाठी तब्बल १९ कोटी ७६ लाख ३१ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके भाऊ समजले जाणारे आ. भीमराव केराम यांनी याकामी
सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले हे मोठे यश असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

केंद्र शासनाच्या “भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य” या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून राज्य शासनास निधी प्राप्त होत आहे. या योजनेंतर्गत प्रामुख्याने विविध नगरपरिषद /नगरपंचायत यांच्या विकास योजना आराखड्यातील कामांना निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सन २०२४-२५ च्या प्रस्तावित निधीतून सदर योजना राबविण्यासाठी विभागीय सह संचालक, नगर रचना, कार्यालयाच्या स्तरावरून विहित कार्यपद्धती अवलंबून योजनेंतर्गत प्रकल्पांकरिता वास्तुविशारद संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. सदर वास्तुविशारद संस्थेमार्फत तयार करण्यात आलेल्या प्रस्तावित विकास कामांच्या नकाशांना संबंधित सह संचालक, नगर रचना/सहायक संचालक, नगर रचना यांचे स्तरावरून मंजुरी देण्यात आली आहे. वास्तुविशारद संस्थेकडून उक्त प्रकल्पांतर्गतच्या विकास कामांची अंदाजपत्रके तयार करून, त्यांना तांत्रिक मंजुरी मिळण्यासाठीचे प्रस्ताव, संबंधित मुख्याधिकारी, नगरपरिषद/नगरपंचायत यांनी “सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित कार्यालय किंवा संचालक, उपवने व उद्याने” यांचेकडे सादर करुन, अशा विकास कामांच्या अंदाजपत्रकांना, तांत्रिक मंजुरी प्राप्त करुन घेतल्या आहेत. केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना २०२५-२६ या प्रस्तावित योजनेंतर्गत संचालक, नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, पुणे यांचेकडून प्राप्त नगरपरिषद / नगरपंचायत माहूर, नरखेड, मोवाड, काटोल, हिंगोली, सेनगाव, घाटंजी, लोणावळा, , किनवट, उदगीर, गंगाखेड, महाबळेश्वर, गंगापूर, गोंदिया व बाळापूर यांच्या विकास योजना आराखड्यातील कामांना दिलेल्या तांत्रिक मान्यतेस अनुसरुन प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

त्याअंतर्गत केंद्र शासनाच्या “भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना २०२५-२६” या प्रस्तावित योजनेंतर्गत माहूर नगरपंचायतसह राज्यातील १५ नगरपरिषद / नगरपंचायत विकास योजना आराखड्यातील रु.३,८१,३१,००,१८१/- च्या कामांना संबंधित विभागाने दिलेल्या तांत्रिक मान्यतेस अनुसरुन या शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेतून माहूर नगरपंचायत अंतर्गत मंजूर विकास आराखड्यानुसार आरक्षण क्र. १९ शहरात व्यापारी संकुल व वाहनतळ विकसित करणे या कामासाठी
१९,६६,३१००० कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

माहूर येथे आरक्षण क्र. १९ याठिकाणी व्यापारी संकुल व वाहनतळ विकसित करण्याचे काम होणार असल्याने एकाच ठिकाणी अनेक दुकाने (व्यापारी संकुल) आणि गाड्यांसाठी पार्किंगची (वाहनतळ) सोय असलेली मोठी व्यावसायिक जागा तयार करण्यात येणार आहे. जिथे आधुनिक सुविधा असतील; ज्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी आणि वाहनांच्या पार्किंगसाठी सोयीस्कर ठिकाण मिळणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होणार आहे, असे हे एकात्मिक नियोजन असणार आहे.
एका मोठ्या इमारतीत किंवा परिसरात होऊ घातलेल्या या व्यापारी संकुलात अनेक व्यावसायिक दुकाने, मॉल्स, कार्यालये इत्यादींचा समावेश असणार आहे.येथे ग्राहकांना विविध वस्तू आणि सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. तर वाहनतळावर वाहने (गाड्या, दुचाकी) पार्क करण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध असणार आहे. ज्याचा उपयोग व्यापारी संकुलात येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांच्या सोयीसाठी होणार आहे. विशेष म्हणजे माहूर शहरात विकसित करण्यात येणाऱ्या व्यापारी संकुल व वाहनतळामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व सोयी मिळणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे कारण वाहने एकाच ठिकाणी पार्क करता येणार आहे. यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार असून व्यावसायिक वातावरण सुधारणार आहे.एकाच जागेत व्यापार आणि पार्किंगची सोय असल्याने पायाभूत सुविधांचा योग्य वापर होणार आहे.
म्हणजेच आता लवकरच माहूर शहरात व्यापारी संकुल व वाहनतळ विकसित करण्याचे काम सुरू करुन ग्राहकांना खरेदीचा आणि वाहनांच्या पार्किंगचा चांगला अनुभव देण्यासाठी एक सुनियोजित व्यावसायिक जागा तयार करण्यात येणार आहे.

शासनाच्या या विकासात्मक निर्णयाबद्दल आमदार भीमराव केराम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह नगरविकास मंत्री यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे,तर भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपू महामुने यांनी आमदार भीमराव केराम यांचे शहरवासियांच्यावतीने आभार मानले असून, व्यावसायिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Post Views: 183
Previous Post

देगलूर महाविद्यालयात हिंद – दी – चादर कार्यक्रम संपन्न

Next Post

आदिलाबाद मार्गावर डीआरएम प्रदीप कामले यांचा पाहणी दौरा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

आदिलाबाद मार्गावर डीआरएम प्रदीप कामले यांचा पाहणी दौरा

ताज्या बातम्या

सदोष मनुष्य वध प्रकरणी क्रिकेट कोच ला उच्च न्यायालयात जामीन

August 20, 2026

स्वतःच्या शेतात सर्पदंश झालेल्या 32 वर्षीय शेतकऱ्याचा अखेर मृत्यू 

August 20, 2026
विभागीय स्पर्धेच्या निश्चितीनंतर सोलापूर शहरचे वेळापत्रक निश्चित करणार 

विभागीय स्पर्धेच्या निश्चितीनंतर सोलापूर शहरचे वेळापत्रक निश्चित करणार 

August 20, 2026
अनुकंपा नियुक्तीचा प्रस्ताव ऑनलाइन मंजूर

अनुकंपा नियुक्तीचा प्रस्ताव ऑनलाइन मंजूर

August 20, 2026

जिल्हा परिषद धाराशिवचा अभिनव उपक्रम : समुदाय संसाधन व्यक्तींना प्रति प्रस्ताव मिळणार १,००० रुपयांचे प्रोत्साहन

August 20, 2026
रेवणसिद्धेश्वर कलशेट्टी यांचा सत्कार

रेवणसिद्धेश्वर कलशेट्टी यांचा सत्कार

August 20, 2026
श्री सोन्या मारुती युवक गणेशोत्सव मंडळाच्या सार्वजनिक गणेश मूर्तीला डोळ्याची लेन्स आली बसविण्यात 

श्री सोन्या मारुती युवक गणेशोत्सव मंडळाच्या सार्वजनिक गणेश मूर्तीला डोळ्याची लेन्स आली बसविण्यात 

August 20, 2026

 गाळे सील करण्याचे उद्दिष्ट न पाळल्याने १४ कर्मचाऱ्यांना दंड

August 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1096124

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!