सोलापूर – महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन शाखा सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘दिवाळी फराळ’ कार्यक्रम हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उदाहरण ठरले. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख उपस्थित होते. फराळ कार्यक्रमातून हिंदु मुस्लीम कर्मचारी एकत्र आल्याने सीईओ कुलदीप जंगम यांनी कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तजमुल मुतवली, डॉ. एस. पी. माने, श्रीधर कलशेट्टी, विशाल घोगरे, चेतन वाघमारे, श्रीशैल देशमुख, त्रिमूर्ती राऊत, शिवाजी राठोड, विलास मसलकर, रफिक मुल्ला, रफिक शेख, आदीनी परिश्रम घेतले . यावेळी सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सदर कार्यक्रमानिमित्त महिला प्रतिनिधी राजश्री कागरे, माढेकर मॅडम, रिमा पवार , निर्मला राठोड , मृणाली शिंदे, सविता मिसाळ उपस्थित होते


















