सोलापूर – राजमाता जिजाऊ जयंती, हुतात्मा दिन, आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त वालचंद महाविद्यालयात वुमेन स्टडीज सेंटर आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “ऐतिहासिक वेशभूषा सादरीकरण स्पर्धा-2026′ चे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संतोष कोटी होते तर मुख्य अतिथी म्हणून छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे डॉ. युवराज सुरवसे उपस्थित होते. प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
याप्रसंगी बोलताना डॉ. युवराज सुरवसे यांनी राजमाता जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न सत्यात उतरताना या महाराष्ट्राला दोन छत्रपती दिले. असे सांगून स्वामी विवेकानंदांच्या विचारांपासून युवकांनी प्रेरणा घ्यावी. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा. सोलापूर ही क्रांतिकारकांची भूमी आहे. स्वातंत्र्यापूर्वी 17 वर्ष अगोदर स्वातंत्र्याचा सूर्य बघितलेले सोलापूर शहर क्रांतिकारीकांच्या बलिदानाचे शहर आहे. त्यांचे नित्य स्मरण आपण ठेवायला हवे.
ऐतिहासिक महापुरुषांच्या विचारांची अंमलबजावणी विद्यार्थ्यांनी केली तर हा देश बलशाली होईल असे प्रतिपादन डॉ .युवराज सुरवसे यांनी केले. प्राचार्य डॉ.संतोष कोटी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ऐतिहासिक वेशभूषा ही फक्त वेशभूषा नाही तर ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा परिचय आणि अनुभूती असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी वुमेन स्टडीज सेंटरच्या समन्वयक डॉ. रेखा ओव्हाळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर डॉ.अंजना गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना इतिहास विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
या स्पर्धेमध्ये प्रथम -राजनंदिनी मुगळे (येसूबाई), द्वितीय- हर्षदा काळे (येसूबाई), तृतीय- अक्षया कोंका(अहिल्याबाई होळकर), उत्तेजनार्थ- प्रथम- श्रद्धा गायकवाड (माता यशोधरा), द्वितीय -श्रुतिका देशपांडे( टेसी थॉमस) या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. नागनाथ धायगुडे, डॉ. वंदना गवळी, डॉ. महावीर साबळे, डॉ दिपाली पाटील यांनी काम पाहिले. या कार्यक्रमास प्रा. हनुमंत मते, डॉ. अमोल शिंदे, डॉ. रामचंद्र गोरे, डॉ. सचिन नवले ,डॉ.अर्चना एंजल, डॉ. मनीषा चौरे, डॉ. स्मिता ढावरे, डॉ. रचना कपूर आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पद्मावती पाटील यांनी केले तर डॉ. मेघा जगदाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



















