सोलापूर – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व गण- गटात निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर व काँग्रेसच्या पारंपारिक मतदारांच्या सहकार्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा.सातलिंग शटगार यांनी दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस बैठकीत मार्गदर्शन करताना असे केले. दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसची बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे संपन्न झाली या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते नेते जाफरताज पाटील, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष अशोक देवकते, राधाकृष्ण पाटील, मोतीराम चव्हाण, धर्मराज पुजारी, संघटक सिद्राम पवार, सिकंदरताज पाटील, मोहम्मद शेख, अकबर शेख ,प्रशांत कांबळे, देवाप्पा कोळी आदी उपस्थित होते.
जिल्हा उपाध्यक्ष राधाकृष्ण पाटील, मोतीराम चव्हाण, अशोक देवकते, अनंत म्हेत्रे, महमद शेख, बोरामणीचे रोकडे, वरळीगावचे सुनील देवकर, मस्तीचे श्याम जाधव, गंगेवाडीचे महादेव जाधव, बंकलगीचे किरण सुर्वे, लवंगीचे प्रशांत कांबळे, तीर्थचे कल्याण मेनते, सचिन होनमाने, धोत्रीचे लक्ष्मण सुतार, निम्बर्गीचे उमेश वाघमारे आदींनी मनोगत व्यक्त केले .
बैठकीचे सूत्रसंचालन अशोक कस्तुरे यांनी केले . तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश जोकर यांनी आभार मानले.
यावेळी सिद्राम सलवदे, अँड. गजेंद्र खरात, सुरेश शिंदे ,अमीर शेख, शिवाजी कांबळे, असलम शेख, महादेव नरोणे ,रावसाहेब होनमाने, अकबर शेख, शब्बीर नदाफ, गेनसिद्ध मोटे, रविकांत पाटील,शैलेश पाटील, दत्तात्रय गजबार, विनोद रणसूरे, दत्तात्रय पवार, उमाकांत येरवडे, किरण सुर्वे, लक्ष्मण चितळे, श्रीशैल भूशणगी आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















