अक्कलकोट – सोलापूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे माजी आमदार स्व.सिद्रामप्पा पाटील यांच्या तालुक्यातील एक गट अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाण्याच्या निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खलबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची सोलापूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी भेटी घेतले. यावेळी अक्कलकोट तालुक्यातील श्री स्वामी समर्थ कारखाना जीर्णोद्धार साठी व तालुक्यातील शेतकऱ्याची अडचण सोडवण्या बाबत राजकीय व सामाजिक चर्चा झाली. यावेळी कृषिमंत्री तथा सोलापूरचे माजी पालक मंत्री दत्ता मामा भरणे, महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील सह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते गाणं उपस्थित होते.
























