बार्शी – राजमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना प्रणित, हिंदवी समाचार दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन माजी आमदार राजेंद्र राऊत व नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बार्शी नगरपरिषदेसमोरील शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता मॉंसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
ज्येष्ठ संपादक राजा माने यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना २०२१ मध्ये करण्यात आली. राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे राज्य प्रसिद्ध प्रमुख व हिंदवी समाचारचे संपादक धिरज शेळके यांच्या हिंदवी समाचार दिनदर्शिका २०२६ चा प्रकाशन सोहळा मा. आ. राजेंद्र राऊत व नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष रोहित पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शितल बोपलकर, ऍड. राजश्री डमरे – तलवाड, अपर्णा मिठे, संतोष सूर्यवंशी, संजय बारबोले, बाबासाहेब कापसे, सिद्धार्थ बसवंत, नगरसेवक दास मस्के, मदन गव्हाणे, भैय्या बारंगुळे, विजय राऊत, अजय पाटील, ऍड. गणेश हांडे, उमेश काळे, राजाभाऊ पैकेकर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, पत्रकार, विविध संघटनेचे पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण कोकाटे यांनी केले. प्रस्तावना विजय राऊत यांनी तर आभार ऍड. आकाश तावडे यांनी मानले.

















