करमाळा – करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानास सुरुवात झाली आहे. कै. साधनाबाई जगताप प्राथमिक प्रशालेतील मतदान केंद्रावर करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रांवर मतदारांची लक्षणीय गर्दी दिसत असून दुपारी ३:३० वाजेपर्यंत शहरातील १२४०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
यावेळी शिवसेनेच्या (शिंदे गट) नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. नंदिनीदेवी जगताप, तसेच जगताप कुटुंबीय उपस्थित होते. मतदानानंतर जयवंतराव जगताप यांनी नागरिकांना लोकशाहीच्या सणात उत्साहाने सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले.
करमाळ्यात सुरळीत व शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत असून सकाळपासून विविध मतदान केंद्रांवर मतदारांची चांगली उपस्थिती दिसून येत आहे.
























