Wednesday, November 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भूमी आभिलेख कार्यालयातील कुचकामी कर्मचार्‍याच्या निषेधार्थ कार्यालयास कुलूप ठोकून कोंडले

तरुण भारतbyतरुण भारत
December 3, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा : येथील भूमी अभिलेख कार्यालयात ग्रामीण भागातून येणार्‍या नागरिकांची नोंदीची व अन्य कामे वेळेत होत नसल्याने सुज्ञ नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करुन याचा निषेध म्हणून चक्क अधिकार्‍यासह कर्मचार्‍यांना कोंडून ठेवण्याचा प्रकार घडला असून येथील अधिकार्‍याची उचलबांगडी करुन सक्षम अधिकारी नेमण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

या कार्यालयाअंतर्गत नोंद असलेल्या अनेक दस्तऐवज मध्ये वारस नोंद करणे, बँक कर्जाचा बोजा चढवणे,नवीन नोंदी प्रमाणित करणे, अज्ञान पालन नाव लावणे,सज्ञान झाल्यावर नाव कमी करणे, हक्कसोडपत्र,बक्षीसपात्रासाठी आवश्यक दस्त उपलब्ध करणे, यासह अन्य कामासाठी महिनानोमहिने नागरिक हेलपाटे घालत आहेत. याशिवाय जमीन मोजणीचे काम देखील याच कार्यालयाशी निगडीत आहे मात्र या कार्यालयाकडून या नागरिकांची कामे वेळेत पुर्ण केली जात नाहीत, प्रत्येक वेळेला हेलपाटे मारुनही नागरिकांची कामे पुर्ण होत नसल्याने गेल्या अनेक दिवसापासून नागरिक संताप व्यक्त करीत होते. त्याची परिसीमा आज सुज्ञ नागरिकांनी ओलांडली व चक्क भूमी अधिक्षक यांच्यासह सर्व कर्मचार्‍यांना गेटला कुलूप लावून जवळपास तासभर कोंडून ठेवत अधिकारी व कर्मचार्‍यांचा निषेध व्यक्त केला. येथील भूमी अधिक्षक एक महिला अधिकारी असून या महिला अधिकार्‍याचे कुठल्याच कर्मचार्‍यावर नियंत्रण नसल्याने कामाचा ढीग पेडींग अवस्थेत पडला आहे. नागरिक व शेतकर्‍यांनी अधिकार्‍यास याबाबत विचारल्यावर अधिकारी संबंधीतांना व्यवस्थित समाधानकारक उत्तर देत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यापुर्वी असलेले अधिकारी कार्यालयीन वेळेत कामे पुर्ण करीत असल्याने आत्तापर्यंत असा प्रकार कधीच घडला नव्हता. केवळ महिला अधिकारी ह्या निष्क्रिय असल्यामुळे त्यांना कोंडण्याचा प्रकार घडल्याची खमंग चर्चा कार्यालयीन परिसरात ऐकावयास मिळत होती. मंगळवेढा शहरला गफूर तांबोळी व संजय कोंडावडे हे परिक्षण भूमापक असून या दोघांच्या कुचराईमुळे शहरातील कामेही रेंगाळत पडली आहेत. या दोघांची उचलबांगडी करुन तेथे सक्षम कर्मचारी नेमून शहरवासीयांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली.

यावेळी सिदराया माळी, युवराज टेकाळे, समाधान हेंबाडे,  रोहिदास कांबळे, बापुसो घोडके, राम मेटकरी, सचिन सरवदे उपस्थित होते. या संदर्भात भूमी अभिलेख कार्यालयाच्या प्रमुखाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्यामुळे अधिकचा तपशील मिळू शकला नाही.

मंगळवेढा येथील भूमी अभिलेख कार्यालयाला नागरिकांनी संतापून कुलूप ठोकल्याचे छायाचित्रात दिसत आहे.

Views: 117
Previous Post

मा.आ. जयवंतराव जगताप यांच्यासह कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

Next Post

जागतिक एड्स दिनाच्या सायकल जनजागरण रॅलीत ५०० सायकलस्वार युवक युवतीचा सहभाग

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जागतिक एड्स दिनाच्या सायकल जनजागरण रॅलीत ५०० सायकलस्वार युवक युवतीचा सहभाग

ताज्या बातम्या

हुतात्मा स्मृती मंदिर विकास सहकारी बँक सोलापूर देगलूरकर महाराज

November 24, 2026

श्री सिद्धेश्वर मंदिर दीपोत्सवाचा भक्तिमय सोहळा!

November 24, 2026

हजारो दिव्यांनी उजळले श्रीराम मंदिर; दीपोत्सवाचा भक्तिमय सोहळा!

November 24, 2026
गोपाळपुर काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता 

गोपाळपुर काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता 

November 24, 2026
आयुष्यात कितीही संकटं आली तरी स्वामींवर ठेवलेली श्रद्धा कधीच ढळू देत नाही – मा.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील 

आयुष्यात कितीही संकटं आली तरी स्वामींवर ठेवलेली श्रद्धा कधीच ढळू देत नाही – मा.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील 

November 24, 2026
त्रिपुरारी पौर्णिमा १ लाख भाविकांनी घेतले दर्शन

त्रिपुरारी पौर्णिमा १ लाख भाविकांनी घेतले दर्शन

November 24, 2026
भगवान श्री १००८ मुनिसुव्रतनाथ यांच्या ३१ फुटी भव्य प्रतिमेचा शिलान्यास व भूमिपूजन सोहळा संपन्न

भगवान श्री १००८ मुनिसुव्रतनाथ यांच्या ३१ फुटी भव्य प्रतिमेचा शिलान्यास व भूमिपूजन सोहळा संपन्न

November 24, 2026

महामार्ग सुरक्षेत मोडनिंब पोलिसांचा ठसा; वाहतूक शिस्त सुरक्षित प्रवासाची दक्षता 

November 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1560451

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!