मुखेड / नांदेड – मुखेड नगर परिषद निवडणूक प्रचारांना आता वेग आला असून निवडणुकी अगोदरच भाजपाच्या एका उमेदवाराला विजयाचा गुलाल लागला आहे . बिनविरोध निवड झाल्याबद्दल स्नेहा संजय तमशेटे यांचा माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड साहेब यांच्या हस्ते शाल व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला आहे.
मुखेड नगर परिषद प्रभाग क्रमांक – ४ ( अ ) मधील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार स्नेहा संजय तमशेटे
यांच्या विरोधातील उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज छाननीत बाद तर दुसऱ्या एका उमेदवाराने अर्ज माघार घेतल्याने स्नेहा संजय तमशेटे यांची बिनविरोध निवड झाली असून या निवडीबद्दल माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड यांनी बिनविरोध निघालेल्या स्नेहा संजय तमशेटे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.
यावेळी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड साहेब, खुशाल पाटील उमरदरीकर , प्रभाग क्र. ४ ( अ ) चे भाजपाचे अधिकृत उमेदवार राजु बामणे , भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राम सावकार पत्तेवार, अनिल जाजु, नंदकुमार मडगुलवार,किशोरसिंह चव्हाण, शिवाजी राठोड, शिवकुमार बंडे, संजय तमशेटे, करणं रोडगे, बबनसिंग ठाकुर, अशोक गजलवाड, नागनाथ लोखंडे ,सह भाजपाचे पदाधिकारी उमेदवार, व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


















