सोलापूर – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सोलापूरच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान व जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा हॉटेल सेंटर पॉइंट येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते तर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहर मध्येचे आ. देवेंद्र कोठे, पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत, राष्ट्रवादीचे शहर प्रमुख संतोष पवार, शहाजी पवार, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, गुरुशांत धुत्तरगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, श्रीकांत मोरे, सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. सिद्धांत गांधी, प्रा.प्रमोद अवताडे, अक्षय खताळ, किरण मस्तानी, निसार शेख, पत्रकार भगवान परळीकर, छायाचित्रकार रामदास काटकर, वसीम आत्तार, अय्युब कागदी, विजय आवटे, श्रावणी सूर्यवंशी आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा यांनी मानले.

























