तभा फ्लॅश न्यूज/मुदखेड : मुदखेड शहरातील दिव्यांग बांधवांचे मानधन वाढ झाल्याबद्दल प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने जल्लोष साजरा. दिव्यांग बांधवांच्या मानधनात वाढ करावी म्हणुन आमदार बच्चु भाऊ कडू यांनी अनेक वर्षापासून दिलेल्या लढयाला यश मिळाले असल्यामुळे मुदखेड शहरातील दिव्यांग बांधवांच्या वतीने सर्व प्रथम शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी दिव्यांग बांधवाकडून पेढे मिठाई वाटप करून फटाक्याची अतिषबाजी करीत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. दिव्यांग बाधवांकडून ६०००, रुपयाची मागणी होती पण सरकारने १०००, रुपये तटपुंजी मानधन देऊन दिव्यांग बाधवांना दिलासा दिला. आत्ता दिड हजार ऐवजी अडीच हजार मानधन देण्यात येईल अशी घोषणा महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
दिव्यांगाच्या मानधनात वाढ करावी म्हणुन गेल्या अनेक वर्षापासूनं प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चु भाऊ कडू यांनी राज्यभर आंदोलने केली होती रायगड येथिल अन्नत्याग आंदोलन मोझरी येथील उपोषण पाबळ ते आंबोडा येथील १३८ पायदळ आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने दिव्यांगाच्या मानधनात एक हजार रुपयाची वाढ केली असून यानंतर दिव्यांग बांधवांना मानधन अडीच हजार मिळणार आहे. म्हणून सर्व दिव्यांग बांधवांकडून दिव्यांगाचे दैवत बच्चु भाऊ कडू यांचे आभार मानण्यात आले.
प्रहार जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ हुंडेकर,जिल्हा उत्तर – दक्षिण सचिव मारोती मंगरुळे,शिवलिंग माटोरे,प्रहार युवा नेते गजाननं चव्हाण,प्रहार ता.अध्यक्ष माधव पांचाळ,नायगाव ता.अध्यक्ष साईनाथ बोईनवाड,माजी ता.अध्यक्ष अनिल शेटे पा.,ता.सचिव निवडंगे,उमरी महिला अध्यक्ष संगीता बामणे,एसवंत पवार पा.,मिलिंद कागडे,यासह प्रहार कार्यकर्ते व निराधार महिला,शेतकरी वर्ग बहुसंख्येंनी उपस्थित होते.