सोलापूर – कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य, शाखा सांगली व संलग्न सर्व शाखांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे वरिष्ठ लिपिक शिरीष बंडगर यांचा सन्मान काष्टायुब संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष गणेश मोडवी यांच्या हस्ते करण्यात आला.
सांगली येथे आयोजित केलेल्या द्वितीय पुणे विभागीय मेळाव्या मध्ये संघटनामक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बंडगर यांना सन्मानित करण्यात आले आहे. सिव्हिल हॉस्पिटलचे सचिन सोनवणे, पाटबंधारे विभागातील शरण अहिवळे यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी कास्ट्राईब संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मनिष सुरवसे, सचिव अरविंद जेटीथोर, अरुण क्षीरसागर, विजू लोंढे, लक्ष्मण गायकवाड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथील कार्याध्यक्ष रवींद्र हिप्परगे, उपाध्यक्ष किरण कऱ्हाळे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आदर्श कर्मचारी पुरस्कार प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

























