सोलापूर : सोलापूर स्काऊट आणि कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या स्काऊट मास्टर प्राथमिक प्रशिक्षण शिबिरात सोमेश्वर रामेश्वर यंपे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख वस्ती करकंब तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर ) यांचा सर्वोत्कृष्ट स्काऊट मास्टर म्हणून सन्मानित करण्यात आला.
या शिबिरात जिल्ह्यातील 50 शाळेतील शिक्षकांनी भाग घेतला होता सोमेश्वर यांना सर्वाधिक गुण मिळाल्यामुळे सर्वोत्कृष्ट स्काऊट मास्टर म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
जिल्हा प्रशिक्षण आयुक्त शंकरराव यादव, सोलापूर जिल्हा अडल्ट रिसोर्स कमिशनर रशीद पठाण, जिल्हा संघटक श्रीधर मोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले


























