लोहा,:
विचार विकास परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था माळाकोळी तालुका. लोहा च्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून रवींद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल या संस्थेच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे ,सचिव अनिल ढवळे संस्थेचे सहसचिव रघुनाथ धारबा मस्के हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे सचिव तथा पत्रकार विनोद मस्के यांनी प्रास्ताविक यांनी केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष .सुर्यकांत वाघमारे , सचिव अनिल ढवळे, प्राचार्य, श्यामसुंदर कोमले , उपप्राचार्य अर्चना हणमंते यांचा सत्कार करण्यात आला. सहसचिव रघुनाथ मस्के यांच्या हस्ते शिक्षक , सोमनाथ उल्लागडे,शिलरत्न कांबळे, शिक्षिका गोदावरी घुगे , शिल्पा पेटकर, संध्या वाघमारे, प्रियंका बयास,गिता पांचाळ, भगवान मस्के यांचा सत्कार केला..