बिलोली – सगरोळी येथे कौलारू घराला विजेच्या शौकसर्किटमुळे लागलेल्या आगीच्या भडक्यात रहात्या घरासह कपाटातील दाग दागिने, नगदी रोकड व संसार उपयोगी साहित्याची राख रांगोळी झाल्याची घटना आज शनिवार रोजी दुपारच्या सुमारास घडली आसुन यात जवळपास विस ते पंचविस लाख रुपयाचे नुकसान झाल्या चा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सगरोळी येथे शनिवार रोजी गावातील मध्यभागी वस्तीत असलेल्या कौलारू घराला विजेच्या शॉकसर्किटमुळे लागलेल्या आगीत येथील शेतकरी कुटुंबातील हनुमंत दिगंबर सिद्धापुरे, बळवंत बाबाराव सिद्धापुरे, मारोती बापूराव सिद्धापूरे, रेणुकाबाई बालाजी सिद्धापुरे, यांच्या रहात्या कौलारु घरास आज दि.६ डिसेंबर शनिवार रोजी दुपारी बाराच्या सुमारास लागलेल्या आगीत हनुमंत सिद्धापुरे या शेतकऱ्यांच्या घरातील कपाटामध्ये नुकतच सोयाबीन विक्री करून ठेवलेली आडीच लाख नगदी रोकड व मौल्यवान दाग दागिन्यासह संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याचे समजले. तर शेजारील अन्य शेतकऱ्यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य व अन्नधान्य व कौलारू घर यात जळून खाक झाले.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले, पण ही आग आटोक्यात येत नसल्याने तात्काळ बिलोली येथिल अग्रिशामक वहानास फोनवर संपर्क साधून बोलावल्यामुळे दोन तासा नंतर ती आग आटोक्यात आली. या आगीत सदरील शेतकरी कुटुंबाच्या घरासह मोठ्या प्रमाणात साहित्याचे व अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले. असून यात जवळपास विस ते पंचविस लाख रुपयाचे नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या आगीमुळे उघड्यावर पडलेल्या शेतकरी कुटुंबांना शासनाकडून तात्काळ अर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांसह शेतकरी वर्गातून होत आहे. तर ही आग आटोक्यात येण्यासाठी येथील बिट जमादार आंबेराय सी. व्हि, पोलीस कर्मचारी शेख शबीर, राजू पाटील शिंपाळकर, शंकर महाजन, प्रभू मुत्येपोड, वैभव भोसले, शेख मुर्तुज, भगवान पा. सिध्दापुरे, सुनिल खिरप्पवार अरविंद बुच्छलवार, सतीश बुच्छलवार, आदिनाथ बाबणे, कोंडापल्ली शंकर, विकास दमय्यावार, सचिन कल्लोड, सचिन बुच्छलवार, विठ्ठल चुन्नमवार, संजय चून्त्रमवार यांच्यासह शेकडो गावकऱ्यांनी सहकार्य केल्याने ही लोकवस्ती दाट आसल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.























