अक्कलकोट – स्वामी समर्थाच्या पदस्पर्शाने व लिला कार्याने पावन झालेल्या श्री तीर्थक्षेत्र अक्कलकोटी येणाऱ्या भाविकांची वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे . वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसरातील अरुंद रस्ते मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण यामुळे रस्ते अधिकच अरुंद झाली आहेत . वारंवार होणारी वाहतुकीच्या कोंडीला बेशिस्त वाहतुक वाहतुकीच्या रस्त्यावर वाहनात प्रवाशांची चढ उतार वाहने पार्किंग करून दर्शनाला जाण लॉज समोरील वाहन पार्कींग भक्ताची वाहनात चढ उतार याला प्रतिबंध करण्यास वाहतुक पोलीसाना आलेल अपयश व तिथ फिक्सड पॉईट वाहतुक पोलीस गरज असताना इतर ठिकाणी थांबणारे वाहतुक पोलीस यामुळे दिवाळी सुट्टी .सह गुरुवार शनिवार रविवार आता रोजच मंदिर परिसरात वाहतुक कोंडी च्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे . . यामुळे परिसराती लनागरी कासह भाविकानां नाहक त्रास होत आहे .
शनिवारी तीर्थक्षेत्र अककलकोट येथे स्वामी दर्शनार्थ भाविकांची प्रचंड गर्दी दिसुन आली . मैंदर्गी रस्ता ते मंगरुळे चौक बेरड कन्नय्या चौक फत्तेसिंह चौक या परिसरात वाहनाच्या प्रचंड रांगा लागत आहेत . मैंदर्गी रस्त्यावर रस्त्या लगत वाहने दोन्ही बाजुला भाविकांची वाहने उभी केली जात आहेत . मुरलीधर मंदिर समोर फत्तेसिह चौकात रस्त्यावरील लॉज समोर वाहने उभी केली जात असल्याने मंदिरास दर्शनाला जाणारे भाविक रस्त्या वर वाहने उभी करत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे मंदिरा जवळ भाविकांची वाहन प्रवाशी चढ उतार रिक्षात प्रवाशी चढ उतार केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे या त भर अतिक्रमण वाढल्याने रस्ते अधिक अरुंद झाली आहे याकडे नपा चे वाहतुक पोलीसाचे दुर्लक्ष होत आहे यामुळे मंदिर परिसरात फत्तेसिंह चौक पर्यंत मैदर्गी रस्त्या वर वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्यान भाविका तुन तीव्र संताप व्यक्त होत आहे .


















