अकलूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण येथील कार्यक्रमासाठी अकलूज आगारातून 20 बस गाड्या देण्यात आल्या त्यामुळे सुट्टी संपवून विद्यार्थी व भाऊबीजेसाठी आलेल्या बहिणी आपापल्या गावी जाण्यासाठी आज सकाळ पासून बस स्थानकावर ताटकळत बसल्या चित्र आज पाहायला मिळाले बसची कमतरता असल्याने रिझर्वेशन असू नये वेळेवर बसगाड्या सुटल्या नाहीत गर्दी पाहून अनेकांनी आपला प्रवास रद्द केला.
बस स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती याबाबत बस स्थानकावरील अधिकाऱ्यांना वारंवार प्रवासी विचारून भांबावून सोडत होते चौकशी कक्ष बाहेर फलक लावून टाकला होता 20 बस गाड्या फलटण येथे कार्यक्रमास देण्यात आल्याने बस सुटण्यास विलंब होईल.

याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले वरून आदेश आल्यामुळे आम्हाला या गाड्या द्यावा लागल्या मात्र याचा परिणाम नेमका प्रवाशांवर झाला शासन आपली दारी या कार्यक्रमासाठी दिलेल्या बसमुळे प्रवासी मात्र वाऱ्यावरी राहिले प्रचंड संताप व्यक्त करत प्रवासी ताटकळत येणाऱ्या बस मध्ये बसण्यासाठी गर्दी करत होते नुकताच या बस स्थानकाला पुरस्कारही मिळाला आहे परंतु येथील यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झालेली दिसत होती




















