सोलापूर – साहित्य हा जीवनातील सत्यभाव असून, शब्दांच्या माध्यमातून आत्म्याचे स्पंदन जागवणाऱ्या लेखकांचा राज्यस्तरीय गौरव सोहळा निर्मला मठपती फाउंडेशनतर्फे नुकताच उत्साहात पार पडला. महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूरचे अध्यक्ष, पद्माकर कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी बोलताना, कुलकर्णी यांनी सोलापूरच्या भूमीला ‘शब्दांच्या शेतावर उगवलेलं स्वराज्य’ असे गौरवले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसाप सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. श्रुती वडगबाळकर होत्या.
स्वर्गीय निर्मला मठपती फाउंडेशन राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कुलकर्णी यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसाप सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. श्रुती वडगबाळकर होत्या. या समारंभास ज्येष्ठ साहित्यिक योगिराज वाघमारे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. स्मिता पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष शिवांजली स्वामी, सचिव उत्तरेश्वर मठपती, सौ. वंदना कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रुती वडगबाळकर म्हणाल्या की, “साहित्यात वर्तमानाचे भान व भविष्याचा द्रष्टेपणा असावा. साहित्य कोणतेही असो, त्यात मानवी मूल्यांचे जतन, संवर्धन व संरक्षण असावे. सध्या या मूल्यांची पडझड झाली आहे, त्यामुळे या मूल्यांची परत पेरणी करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.”
निर्मला मठपती राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे मानकरी
——————
फाउंडेशनतर्फे कथा, कविता आणि बालवाङ्मय या तीन विभागांतील सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींना सन्मानित करण्यात आले
कथा विभागात बा.बा. कोटंबे (परभणी), प्रतिभा खैरनार नांदगाव, जि. नाशिक, डॉ. गीता जोशी (सोलापूर) कविता विभाग – गीतेश गजानन शिंदे (ठाणे), धर्मवीर पाटील (इस्लामपूर), मुबारक शेख (सोलापूर) बालवाङ्मय बबन शिंदे (कळमनुरी), प्रा.अलका सपकाळ (पाथरूड) जि. धाराशिव,विशेष उल्लेखनीय अशोक खानपूरे,
या कार्यक्रमात राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचा निकालही जाहीर करण्यात आला. विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पुस्तक देऊन गौरविण्यात आले, यात
प्रथम- लक्ष्मीकांत बिराजदार महापूर, द्वितीय- नारायण मगर-मेलगे, तृतीय- अंजली लवळे यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तरेश्वर मठपती यांनी केले, सूत्रसंचालन वंदना कुलकर्णी यांनी तर आभार शिवांजली स्वामी यांनी मानले. याप्रसंगी अविनाश मठपती, कवी मारुती कटकधोंड, कवी गोविंद काळे, अरविंद जोशी, राजेंद्र भोसले, मयुरेश कुलकर्णी, प्रा. अशोक म्हमाने, फैयाज शेख, नितीन वैद्य, विद्या लिमये यांच्यासह सोलापूर आणि परिसरातील अनेक साहित्य रसिक उपस्थित होते.


















