सोलापूर : पती-पत्नीमध्ये घरगुती कारणातून झालेल्या तका्रीनंतर पतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास उघउकीस आली.
सतिश सिध्दाराम पाटील (वय41, रा. खैरदी नगर, अ.कोट रोड सोलापूर)असे पतीचे नाव आहे. सतिश आणि त्याची पत्नी सुधा यांच्यात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घरगुती कारणातून तक्रार झाली. या तक्रारीनंतर संतापलेल्या सतिशने राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्याने त्यांनी सतिशला गळफासातून सोडवले. रात्री आठ वाजता पत्नी सुधा यांनी शासकीय रुगणालयात दाखल केल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.