बहुजन समाज पार्टीने (बि एस पी) टिकीट दिल्यास नायगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविणार —गंगाधर सवई…
उमरी तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा पत्रकार गंगाधरराव माणिकराव सवई यांनी दै, तरूण भारत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे पुढे म्हणाले की.गेल्या चाळीस वर्षे पूर्ण झाली आहे राजकीय क्षेत्रातील काम करत असुन.खुप मोठा अनुभव मिळाला आहे सुरुवात भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ते बहुजन समाज पार्टी अशी पक्षाचे कामं केले आहे.
नामांतर लढ्यात अनेक खेडेगावात दलित समाजातील लोकांनवर झालेल्या अन्याय अत्याचार विरोधात शाषन दरबारात लढा दिला.अनेक ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव साजरा होऊ नये म्हणून कटकारस्थान करणाऱ्या लोकांविरुद्ध खटले दाखल केले.आजही कांहीं ठिकाणीं दलित समाजातील लोकांनवर अत्याचार चालू आहेत.भहिषकार टाकुन समाजात तेढ निर्माण केला असता अशाही ठिकाणी जाऊन त्या समाजाला धिर देत खंबीर पणे पाठिंबा दिला.वेळप्रंसगी जेलमध्ये सुध्दा गेलोय परंतु माघार घेतली नाही.
सध्या नायगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील बरेच जण निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जाते आपण ही निवडणूक लढाव असं विचार केला आणि बहुजन समाज पार्टी कडे टिकीट मागीतले आहे.जर पक्षाने संधी दिल्यास नक्कीच नायगाव विधानसभा निवडणुकीत उभे राहू.या वेळेस धनशक्ती विरुद्ध जनशक्ती सगळ्यांचा प्रसाद घेतला तरी मतदान कोणाला करतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
सध्या पक्षाकडे एकमेव आपणच मागणी केली आहे.नक्कीच पक्ष विचार करेल अशी अपेक्षा आहे.