अक्कलकोट – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने अक्कलकोट नगरीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्यास संधी दिल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धाराम पोतदार यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयात सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अक्कलकोट , दुधनी व मैंदर्गी येथील नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धाराम पोतदार यांनी अक्कलकोट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे सांगितले. सिद्धाराम पोतदार हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे काम करत आहेत.
सिद्धाराम पोतदार हे सुवर्णकार समाजाचे कालिका देवस्थानचे अध्यक्ष म्हणून काम केले आहेत. तसेच सामाजिक क्षेत्रातील काम करत आहेत.सिद्धाराम पोतदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संधी दिल्यास लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सिद्धाराम पोतदार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून अक्कलकोट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याने अक्कलकोट नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही बहुरंगी होण्याची चिन्ह दिसत आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बंदेनवाज कोरबू , ओबीसी सेल तालुकाध्यक्ष स्वामीनाथ पोतदार , किसान सेलचे तालुकाध्यक्ष काशिनाथ बगले , ओबीसीचे युवक अध्यक्ष उमेश खुने , हत्तरसंगचे माजी सरपंच बापूराव पाटील आदी उपस्थित होते.



















