सोलापूर – खऱ्या अर्थाने सोलापूरचा विकास करायचा असेल तर शिवसेनाच सक्षम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीमुळे सामान्य कार्यकर्त्याला बळ मिळत असून सोलापूर महानगरपालिकेत भगवा फडकवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी मांडले.
एमआयडीसी परिसरातील आशा नगर येथील प्रभाग 12 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या संघटनशक्तीत मोठी भर पडली असून श्रीनिवास संगा आणि शहरप्रमुख सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, तसेच दामिनी जवळकर यांच्या पुढाकारातून सामाजिक कार्यकर्ते निलेश अळगुंडगी व मित्रपरिवाराचा शिवसेनेत प्रवेश करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, कामगार सेनेचे सायबण्णा तेगेळ्ळी यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
यांचा झाला शिवसेनेत प्रवेश
काशिनाथ बोनगरगे, विनायक कांबळे, संदीप सुनगर, गणेश क्षीरसागर, अनिल अडकी, अनिल माळी, विशाल गोब्बुरे, गुरु म्हेत्रे, सदानंद बंदलगी, आकाश कोणजी या सामाजिक कार्यकर्त्यांनीही शिवसेना एकनाथ शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला.
स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य द्या महापालिका निवडणुकीत प्रभाग 12 मधील स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य द्या, स्थानिक समस्यांची खरी जाण स्थानिक नेतृत्वालाच असते. प्रभाग 12 भगवामय करू, महापालिका निवडणुकीत शिवसेनाला नवे राजकीय समीकरण मिळाले असून संघटनबळात मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
– युवा नेते श्रीनिवास संगा


























