नवीन नांदेड – सिडको परिसरातील राजश्री पब्लिक स्कूल लातूर रोड नांदेड येथे दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणास आलेले प्रमुख अतिथी न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.तेव्हा विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन अधिकारी केल्यास त्यांच्या आई-वडिलांना व गुरुजनांना जो आनंद मिळतो तो सर्वश्रेष्ठ आनंद असतो असे मत व्यक्त केले.
सिडको परिसरातील राजश्री पब्लिक स्कूल लातूर रोड नांदेड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सुभाष रामराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचे भाषण, सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक अंक हस्तलिखित प्रकाशित करण्यात आले. वरील सर्व क्षेत्रात सहभाग नोंदल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सध्याच्या युगात पुस्तकी ज्ञान व स्पर्धात्मक ज्ञाना सोबतच व्यावहारिक व व्यावसायिक ज्ञान असणे हे किती गरजेचे आहे. या आनंदनगरी व्यवसायातून लक्षात येते. याआनंद नगरी उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा मुख्य न्यायाधीश सुनील वेदपाठक व त्यांच्या पत्नी सौ. अर्चनाताई वेदपाठक यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी शिक्षण, संस्कार, शिस्त, व्यायाम व आरोग्य या सर्व गोष्टी शाळेमध्ये आवर्जून घेतल्या जातात.
यावेळी या कार्यक्रमास परिसरातील नवनिर्वाचित नगरसेवक सौ. अनुराधा काळे, सौ.दिपाली मोरे,सौ. सुवर्णा बस्वदे, राजू लांडगे, गंगाप्रसाद काकडे, वैजनाथ देशमुख, अभिषेक सौदे यांची प्रमुख उपस्थिती होती.दरम्यान शाळेच्या संचालिका सौ. डॉ. कल्पना पाटील, सचिव दिलीप पाटील, इंजि. अनुराग पाटील, व्यवस्थापक सुशांत पाटील तोरणेकर, सौ धनश्री तोरणेकर, सौ अश्विनी देशमुख, मुख्याध्यापक ज्ञानोबा मुंडे, मंदार खोसे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
यावेळी आनंद नगरीतील सहभागी विद्यार्थ्यांचे उभारलेले ६९ स्टॉल मधून मिळालेली खरी कमाईची रक्कम लक्षणीय ८७ हजार ७२० येवडी झाल्यांयाने विद्यार्थ्यांचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले.
























