सोलापूर – मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्यावतीने शहिद टिपू सुलतान यांच्या २७५ व्या जयंतीनिमित्त टिपू सुलतान चौक येथे शिवजन्मोसत्व मध्यवर्ती महामंडळ ट्रष्टी पद्माकर काळे, परिवहन समितीचे सभापती राजन जाधव, सकल मराठा संघटनेचे माऊली पवार, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, शिवालय सामाजिक संघटेचे संस्थापक प्रकाश शिंदे, मातंग कृती समितीचे अध्यक्ष युवराज पवार, सुरेश ननवरे, मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष म. शफीक रचभरे, राजा बागवान, लतीफ शाब्दी, सैफूदिन मनियार, हारुण शेख यांच्या प्रमुख उपस्थित टिपू सुलतान यांच्या नामफलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
टिपू सुलतान यांनी आपल्या हयातीत परकीय इंग्रजांना रोखण्याच काम केले. सालभाईचा तह करून एतद्देशीय राज्यकर्त्यांना एकत्र केले. श्रृंगेरी मठाच पुनर्वसन केले. टिपूंना आत्मघात करून मारले नसते तर कदाचित इंग्रज भारतात राज्य करु शकले नसते असे मत राजन जाधव यांनी सांगितले. यावेळी टिपू सुल्तानच्या 275 व्या जयंतीनिमित्त २७५ गरिब गरजूंना चादर वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू हुंडेकरी, रिझवान दंडोती, बशीर सय्यद, जावेद बद्दी, रियाज पैलवान, शेरु उस्ताद, तन्वीर गुलजार, रुस्तुम शेख, कय्युम मोहळकर, कादर भागानगरी, मुबीन बागवान, मोहसीन शेख, इरफान बागवान, हारिस शेख, इसूफ शेख,इक्बाल शेख, मोहसीन नदाफ, सरफराज काझी, वाहिद तांबोळी, काशीब बेलीफ, शब्बीर फुलमामडी, वशिम शेख, तन्वीर शेख, हुजेर बागवान, अली बागवान आदी उपस्थित होते.

















