सोलपूर – शिवशरण पाटील यांचा जीप चालक मालक संघटना ते आमदारपर्यंतचा कामाचा धडाका तसेच त्यांचा जनसंपर्क वाखाणण्याजोगा आहे.त्यांनी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यामुळे तसेच सोलापूरला आल्याने मला अधिक ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन निवृत पोलिस महासंचालक अहमद जावेद यांनी केले. शासकीय सेवेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यास भ्रष्टाचार न करताही चांगले जीवन जगता येते,हे त्यांनी आवर्जून सांगितले.
माजी आमदार शिवशरण पाटील यांनी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात अहमद जावेद बोलत होते. व्यासपीठावर शिवव्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे,ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सौ.आशालता जगताप,माजी विरोधी पक्षनेते रामचंद्र जन्नु,नरेंद्र काळे,शहर भाजपच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर सिद्धेश्वर पाटील,रमेश पाटील,गुरुलिंग कन्नुरकर,सुभाष चव्हाण आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी शिवशरण पाटील यांनी सर्वांचे स्वागत करुन दिवाळीनिमित सर्व मंडळी एकत्रित येऊन गप्पागोष्टी व्हाव्यात हाच उद्देश स्नेहमेळाव्याचे असल्याचे सांगितले.
डॉ.शिवरत्न शेटे म्हणाले की, स्नेहमेळाव्यात फराळाच्या मेनूपेक्षा संस्काराचे मेनू फार महत्वाचे आहेत.अहमद जावेद सारखी प्रामाणिक पोलिस अधिकारी वर्गांचे सॉफ्टवेअर आजच्या तरुण पिढीमध्ये फिड करणे गरजेचे आहे असे म्हटले.
या स्नेहमेळाव्यास पुरुषोत्तम बरडे,माजी नगरसेविका सौ शैलजा राठोड,विठ्ठल व्हनमारे, शैलेश आमणगी, सिद्धारुढ आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वश्री अशोक भांजे यांच्या मार्गदर्शनाखाली मदन पोलके सिद्धेश्वर पाटील सर, शेखर देशमुख, गंगाधर पाटील, संतोष हिरेमठ,अजीज जमादार, लालसिंग चव्हाण बगले आदींनी विशेष परिश्रम घेतले.




















