अर्धापूर / नांदेड – नांदेड – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अर्धापूर पोलीस ठाण्याचे हद्दीत पार्डी म.येथील टोलनाका जवळ दि.११ मंगळवारी दुपारच्या सुमारास नांदेडच्या दिशेने जाणारा १० टायरी ट्रक पोलीसांनी अडविले. त्यातून अवैध रित्या तब्बल ५२ रेड्याची वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. याप्रकारे हरियाणा, उत्तर प्रदेश येथील तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तब्बल ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांच्या कार्यवाहीने अवैध गोवंश व्यावसायिकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, नांदेड – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अर्धापूर पोलीस ठाण्याचे हद्दीत पार्डी म.येथील टोलनाका जवळ संशयित रित्या जनावरांची वाहतूक केली जात असल्याच्या गुप्त माहीतीवरून संशयित वाहनाची पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पोउनी परमेश्वर सुर्यवंशी, गजानन शिंदे, संभाजी गोहरकर, महेंद्र डांगे आदींनी तपासणी केली असता त्यात कंटेनरची थांबवून तपासणी केली असता रेड्याची विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसून आले. तसेच क्षमतेपेक्षा जास्त भरुण त्यास क्रुरतेने निर्दयपणे वाहणामध्ये जनावरे कोंबुन जनावरांची अवैध वाहतुक करुन जनावरांची काळजी घेण्यात व देखरेख करण्यात कसुर करताना मिळुन आले. यात काळ्या रंगाचे ५२ रेडे अंदाजे दिड ते दोन
वर्षे वय रेड्याची एकुन किंमत अंदाजे पंधरा लाख रुपये, एक दहा टायरी कंटेनर क्र. के.ए.०१ ए.एम.८५३६ किंमत अंदाजे ३० लाख रुपये असा एकुन ४५ लाख रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी परमेश्वर सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक इरशात पि. इसाक वय ३३ वर्ष रा बिचोंदय मोहल्ला घसेरा जि. नुहू मेवाद राज्य हरियाना, सुफियान जान मोहम्मद वय २६ वर्ष रा. घोशीयान जि. बागपत राज्य उत्तरप्रदेश, हन्नी जान महम्मद वय २५ वर्षे रा.घंग मोहल्ला होली चौक घसेरा मेवात राज्य हरियाना तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळीमध्ये खळबळ उडाली आहे.



























