सोलापूर – राज्य उत्पादन शुल्क विभागाची गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य वाहतूक व बनावट मद्यविक्री, निर्मिती केद्रावर तसेच अवैध देशी/विदेशी मद्य व हातभट्टी दारु निर्मिती/विक्री/वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत ४ वाहनांसह रूपये १६ लाख ५१ हजार २२०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची राजेश देशमुख, आयुक्त, महाराष्ट्र राज्य, प्रसाद सुर्वे (अं व द) मुंबई, व सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग याच्या निर्देशानुसार भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर जे.एन. पाटील प्रभारी उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर याच्या मार्गदर्शनाखाली दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर क्र.२ विभाग सोलापूर यांनी मौजे गोपाळपूर ता. पंढरपूर जि. सोलापूर येथे अवैध गोवा बनावटीचे विदेशी मद्याची वाहतूक करणारी १ टाटा इंडिका व्हीस्टा कार विदेशी मद्याच्या ७५० मिलीच्या ३७ बाटल्या व विदेशी मद्याची बनावट २५० टोपनासह एकुण रु.३८४०६०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कुडूवाडी क्र.२ यांनी मौजे. इंदापूर ता. बार्शी येथे बनावट विदेशी मद्य निर्मितीवर कारवाई केली असुन सदर कारवाईत ५३७५ विदेशी मद्याची बनावट टोपने व विदेशी मद्यासह एकुण रु.७५२५/-किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.२, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कुडूवाडी विभाग, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक धाराशिव, वैराग पोलीस स्टेशन स्टाफसह केलेल्या मौजे. भातंबरे ता. बार्शी संयुक्त कारवाई तसेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, माळशिरस विभाग यांनी हातभट्टी दारु निर्मिती/विक्री/वाहतूकीवर केलेल्या धडक कारवाईत १५ गुन्हे नोंद करण्यात आले असुन १० जणांवर कारवाई करुन २४,१८० ली. गुळमिश्रित रसायन, ६८० लि. हातभट्टी दारु, ३८.८८ ब.ली. विदेशी मद्य, २२.९५ ब.ली. देशी मद्य, २७.७५ ब.ली गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य, १.६२ ब.ली. बनावट विदेशी मद्य व ५६२५ बनावट टोपने तसेच ४ वाहनासह एकुण रूपये १६,५१,२२०/-चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अ-विभाग सोलापूर यांनी अवैध ढाब्यावर कलम ६८ व ८४ अंतर्गत कारवाई करुन ४ आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे.
सदर कारवाई निरीक्षक पंकज कुंभार, भवड, मोहिते, राकेश पवार, तसेच दुय्यम निरीक्षक प्रितम पडवळ, पी.जी.कदम, बी.वाय.चव्हाण, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गुरुदत्त भंडारी, आनंद जोशी, बिराजदार जवान सर्वश्री विजय शेळके, विनायक वाळुजकर, योगीरज तोग्गी, प्रकाश सावंत, पुसावळे, योगेश पाटील, महिला जवान कल्पना जाधव, वाहनचालक मारुती जडगे, राम मदने यांनी पार पाडली.

























