मुदखेड / नांदेड – मुदखेड तालुक्यातील काही भाग गोदावरी नदीच्या काठावर असल्यामुळे तेथील भागातील काही मुजोर अवैध रेतीची उत्खनन करून वाहतूक करत शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडवत असून याकडे शासन आणि लोकप्रतिनिधी सर्रासपणे दुर्लक्ष करत असून तालुक्यातील वाई येथील शेतकरी प्रमोद आनंदराव पवार यांच्या बैलाला आज दि.२७ डिसेंबर रोजी अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवा बिना नंबर प्लेटच्या वाहनाने जबर धडक देत जखमी केले.
तालुक्यात एकाकडे पोलीस प्रशासन गुप्तरित्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर संबंधित अवैध रेतीची उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या रेथी माफियांच्या यंत्रणेवर कारवाई करत असताना तालुक्यातील जांभळी , बेंबर, वाई वरदडा तांडा या परिसरात जोमाने वाहतूक करून रेतीची सरासपणे विक्री करताना दिसत असून या भागाकडे स्पष्टपणे शासन व लोकप्रतिनिधी गंभीर दिसत नसून या भागातील नागरिकांकडून शासनाकडे व लोकप्रतिनिधीकडे एका आशेच्या आशेने योग्य ती कारवाई करत ग्रामीण भागातील नागरिकांना अशा अमानुषपणे जोमाने वाहतूक करणाऱ्या रेती माफियांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होताना दिसत आहे.

























