मुदखेड: तालुक्यातील महसूल व पोलीस प्रशासनामार्फत आज सकाळी वासरी, शंखतिर्थ व टाकळी परिसरातील गोदावरी नदीपात्रातील चार फायबर बोट, तिन लहान बोट जिलेटीनच्या सहाय्याने उडविण्यात व दोन थरमाकॉलचे तराफे आल्या तसेच एक वाहन अवैध रेती वाहतूक करीत असलेले पोलिस स्टेशन मुदखेड येथे लावण्यात आले. यामध्ये जवळपास रु.९५,३०,०००/- लाखाचे नुकसान झाले आहे.
दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी ०६.०० वाजता मातासाब गुरूद्वारा,मुगट परिसरात तहसिल कार्यालयामार्फत गोदावरी नदीपात्रात बोट टाकण्यात आली. त्यामध्ये वासरी व शंखतिर्थ येथील गोदावरी नदीपात्रामध्ये अवैध रेती उपसा करणा-या तिन मोठया फायबर बोट व तिन छोट्या बोट आढळून आल्या. सदर पकडण्यात आलेल्या बोटी ह्या जिलेटीनच्या सहाय्याने नदीपात्रातच उडविण्यात आल्या. यामध्ये तिन फायबर बोट ज्यांची अंदाजीत किंमत रु.६०/- लक्ष व तिन छोट्या बोट अंदाजीत किंमत रु.१५/- लक्ष, वाळु साठवणूकीसाठी असलेले थरमाकॉलचे दोन तराफे ज्यांची किंमत अंदाजीत रु.३०/- हजार असे साहित्य जिलेटीनच्या सहाय्याने उडविण्यात आले.
तसेच एक वाहन ज्याचा क्रमांक MH-26 /BE-5501 तो अवैध रेतीची वाहतूक करतांना मुगट ते ब्राम्हणवाडा रस्त्यावर आढळून आला त्यास सुध्दा पुढील दंडात्मक कार्यवाहीस्तव पोलीस स्टेशन मुदखेड येथे लावण्यात आले. सदरची कार्यवाही केल्यानंतर टाकळी येथील गोदावरी नदी पात्रामध्ये एक फायबर बोट रेतीचा अवैध उपसा करतांना आढळून आल्याने ती सुध्दा जिलेटीनच्या सहाय्याने उडविण्यात आली. आज केलेल्या कार्यवाहीमध्ये एकुण रु.९५,३०,०००/- एवढ्या मुद्देमालाचे नुकसान झाले आहे.
सदरची कार्यवाही ही राहुल कर्डीले, जिल्हाधिकारी,नांदेड, प्रविण मेंगशेट्टी, उपविभागीय अधिकारी, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली आनंद देऊळगांवकर, तहसिलदार, मुदखेड, मारोतराव जगताप, नायब तहसिलदार,संतोष कामठेकर, नायब तहसिलदार, विजयकुमार पाटे, नायब तहसिलदार,शाम चौधरी, सहा.महसूल अधिकारी,अंजली बार्शिकर, मंडळ अधिकारी,गोपाल माने,विश्वनाथ बोधमवाड,
राजू चव्हाण, राजकुमार मस्के,बाबुराव मुळेकर, मनोज वाघमारे, संताजी देवापूरकर,प्रसाद पांडे, सविता कल्याणकर, रंजना दमकोंडवार, सर्व ग्राम महसूल अधिकारी तसेच पोलीस विभागातील बी.आर.रकांबळे, सहा.पोलीस निरिक्षक, एस.एस.शिंदे, पोलीस उपनिरिक्षक,अंगद कदम,पो.हे.कॉ.महेश कवठेकर, पो.हे.कॉ. राठोड, पो.हे.कॉ. साखरे,पो.हे.कॉ, देशमुख, पो.हे.कॉ.आडे,
पो.हे.कॉ.पुणेबईनवाड, पो.हे.कॉ, कैलास भांगे, सुल्तान पठाण महसूल सेवक व भावेश्वर मुंगल यांनी कार्यवाही पुर्ण केली. सदर अवैध उत्खननाबाबत मारोतराव जगताप, नायब तहसिलदार यांनी पोलीस स्टेशन,मुदखेड येथे गुन्हा नोंदविला आहे.

























