मुदखेड ता प्र
राज्यातील अंशत: तथा विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे अनुदानाच्या वाढीव टप्प्यासाठी राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली पंधरा दिवसांपासून भर उन-पावसात धरणे आंदोलन सुरू आहे. हे अंशतः अनुदानित शिक्षकांच्या अनुदान टप्पा वाढीसह विविध मागण्याबाबत शासन आदेश निर्गम करून आचारसंहितापूर्वी किमान एक महिन्याचा वाढीव टप्पा पगार शिक्षकांच्या खात्यात जमा करून याचा शासन आदेश निर्गमित करावा या प्रमुख मागणीसाठी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासह राज्यभर लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनास पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन , खा. वसंतराव चव्हाण, आ. बालाजी कल्याणकर, आ. विक्रम काळे आ. मोहनराव हंबर्डे आदी लोकप्रतिनिधी भेटी दिल्या. या प्रसंगी महिला शिक्षक भगीणीने पालकमंत्र्यांचे पाय धरत आपल्या वीस वर्षांची दूरदैवी जीवन व्यथा सांगितली. यास शासन जबाबदार असल्याचे निदर्शनास आणून देत शंभर टक्के अनुदान व विविध मागण्या सोडवण्याची आर्तपणे मागणी केली. तेव्हा पालकमंत्री यांनी आठ दिवसांत अनुदानाची गोड बातमी मिळेल असे आश्वासन दिले. पण नांदेड सोडताच या आश्वासनाच विसर पालकमंत्र्यांना पडला. म्हणून नांदेड शिक्षक समन्वय समितीने आज मुंडण आंदोलन केले.
प्रा कैलाश खानसोळे
प्रा तुकाराम वळसंगे
नामदेव गवळे
सोळंके व्ही जी
दिगंबर माने
प्रा गणेश तरटे
प्रा. उत्तम कांबळे
शिवप्रसाद चडगुलवार
सिद्धार्थ शिंदेआदीं शिक्षकांनी मुंडण करत शासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. येत्या दोन दिवसांत निर्णय नाही झाला तर शिक्षक व संस्था चालकांनी शाळा बंदचा इशारा दिला आहे..
या आंदोलनास समाजातील विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक संस्था संघटनांनी पाठिंबा दिला तरी निर्दयी शासन या आंदोलनाची दखल न घेतल्याने शिक्षकांची शोकांतिका वाढतच आहे.
प्रसंगी गंगाप्रसाद नरवाडे यांनी मुंडण करण्याची विनामूल्य सेवा केली त्या बद्दल शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आभार मानले . यावेळी नांदेड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. यापूढेही शासन निर्णय निर्गमित होईपर्यत चालूच राहील असे शिक्षक समन्वयकांनी सांगीतले.