अक्कलकोट – अक्कलकोट नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष भाजपा सोबत आतून दोस्ती वरून कुस्ती खेळत असून अक्कलकोट जनतेची काँग्रेसने फसवणूक करून गद्दारी केली आहे.भाजपाचा सहज विजय व्हावा म्हणून तीन कोटी रुपये घेतल्याची शहरात जोरदार चर्चा चालू आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस भाजप ला सोडून सर्व पक्ष एकत्रित करून उद्या सोमवारी तगडा उमेदवार उभा करू आणि गद्दार काँग्रेसला हद्दपार करणार असल्याची गर्जना शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी केली आहे.
गेल्या सहा वर्षात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी तालुक्यात शेकडो आंदोलन केले. त्यात एक दोन आंदोलन वगळता इतर सर्व आंदोलनात काँग्रेस पक्षाने शामिल झाला नाही. काँग्रेसचे एका शहरातील नेत्याला कोणत्याही टेंडर मिळणार नाही.या भीती पोटी राजकारण करून भाजपला मदत केले आहे. आतून दोस्ती बाहेरून कुस्ती खेळून शहरातील जनतेची फसवणूक करून नुकसान केले आहे. काँग्रेसचे शहरातील एका नेत्याला टेंडर मिळाले पाहिजे.त्यांना पैसा मिळाला पाहिजे अशी आरोप बुक्कानुरे यांनी केले आहे.
अक्कलकोट शहर काँग्रेस भाजपचा बी टीम बनला आहे. सत्ताधाऱ्या कडून अनेक टेंडर मिळाला पाहिजे म्हणून हा शहरातील जनतेशी काँग्रेस गद्दारी केली आहे.हे शहरातील जनतेला माहिती असल्याने यंदा जनता काँग्रेसची चारी मुंड्या चित केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत.
नेहमी भाजप पक्ष खुश राहिला पाहिजे नाहीतर टेंडर सह अनेक धंदे बंद होईल या भीती पोटी शहरातील काँग्रेसचे एकाने जनतेची गद्दार केली आहे.भाजपाचे उमेदवाराचा सहज विजय व्हावा या हेतूने काँग्रेसच्या एका गद्दार नेते कुटिल कारस्थानाची भांडा फोड करू.काँग्रेस भाजपला सोडून सर्व पक्ष एकत्रित करून उद्या एक तगडा उमेदवार उभा करून गद्दार काँग्रेसला हद्दपार करणार असल्याची गर्जना बुक्कानुरे यांनी केली आहे.


















