सोलापूर – श्राविका संस्थेचे विश्वस्त स्व. मा. श्री. रतनचंद शहा यांच्या जन्मजयंतीनिमित्त पी. एस्. व्ही. ट्रस्ट संचलित पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मिडीयम हायस्कूलच्या वतीने विविध प्रकारच्या आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये हस्ताक्षर, वक्तृत्व, चित्रकला व भित्तीचित्रे बनविणे या स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेसाठी शहरातील विविध शाळांमधील ७०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
प्रारंभी श्राविका संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी देवई शहा यांच्या हस्ते सरस्वतीचे पुजन करुन व दिप प्रज्वलन करुन या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत हायस्कूलच्या मुख्याध्यापिका स्वाती कांबळे, पर्यवेक्षक जयेश शिरढोणे, प्री-प्रायमरीच्या समन्वयक अर्चना अक्कलकोटे, प्रायमरी विभागाच्या पर्यवेक्षिका कल्पना रामावत आदी मान्यवर उपस्थित होते.
अतिशय उत्साही वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेचे शिस्तबद्ध पध्दतीचे नियोजन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी देवई शहा यांच्या नेतृत्वाखाली व शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कांबळे तसेच स्पर्धा प्रमुख सिध्दराय मेत्री व सुनिता आळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते;तर या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांबरोबरच पालकवर्ग देखील बहुसंख्येने उपस्थित होता.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


















