Sunday, February 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपूर तालुक्यात ८ गटांसाठी तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी मतदान शांततेत पार

तरुण भारतbyतरुण भारत
February 8, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा वृत्तसेवा,
पंढरपूर –  तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आठ तर पंचायत समितीच्या सोळा जागांसाठी मतदान प्रक्रिया शनिवारी (दि.७) शांततेत पार पडली. तालुक्यात दोन लाख ८५ हजार ८२७ एकुण मतदारांपैकी — इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क आज बजाविला त्यामुळे मतदानाची टक्केवारी —- ऐवढी झाली. विशेष म्हणजे करकंब मध्ये मतदान केंद्रावर आमदार अभिजीत पाटील यांचे बंधु अँड.अमर पाटील आणि भाजपा उमेदवार यांच्या मध्ये तुतुमैमैचा किरकोळ प्रकार वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. तालुक्यात सर्वात जास्त मतदान —– या गटात तर सर्वात कमी मतदान — या गटात झाले.


पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आठ गटांतून ४६ तर पंचायत समितीच्या १६ गणांमधून ७० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. या सर्वं उमेदवारांचे भवितव्य आज मतदाना नंतर मतदान यंत्रात सिलबंद झाले आहे. येत्या ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी नंतरच या सर्वांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.  


दरम्यान जिल्हा परिषदेच्या आठ गटांसाठी तर पंचायत समितीच्या सोळा गणांसाठी मतदान प्रक्रिया गुरुवारी (दि.७) राबविण्यात आली. सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरु झाली. सकाळ पासूनच मतदानास शांततेत सुरुवात झाली. ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवर मतदारांचा मतदानासाठीचा उत्साह दिसत होता. मात्र बऱ्याच गावांमधुन शेतातील दिवसभराची कामे संपल्या नंतर अनेक मतदान केंद्रावर सायंकाळी पाच नंतर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केल्याचे दिसत होते. त्यामुळे सायंकाळी उशिरा पर्यंत अनेक गावांतील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरु होती. 
पंढरपूर तालुक्यात यंदा जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक वेगळ्या राजकीय वळणावर लढली गेल्याचे दिसून आले. कारण पारंपारिक विरोधी गटातील नेते एका व्यासपीठावर तर चार दशकापासून एकत्र राहिलेल्या आघाडीतील नेते मात्र विरोधात प्रचार करीत असल्याचे चित्र प्रचारा दरम्यान पहायला मिळाले. 


विशेष म्हणजे यंदाच्या निवडणूकीत उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यावर तालुक्यात तिरंगी लढत होणार असे स्पष्ट चित्र दिसत होते. मात्र आमदार अभिजीत पाटील व विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके यांनी प्रचार सुरू झाल्यानंतर युतीची घोषणा केली. त्यामुळे तालुक्यात भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा), काँग्रेस व तीर्थक्षेत्र विकास आघाडी अशा लढती  झाल्या.

——————-
नेत्यांनी बजाविला मतदानाचा हक्क
आमदार अभिजीत पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील देगाव या आपल्या गावी मतदानाचा हक्क बजाविला. तर कल्याणराव काळे यांनी आपल्या आईसमवेत संपुर्ण कुटुंबियासह वाडीकुरोली या आपल्या गावी मतदानाचा हक्क बजाविला.
——————-
मतदानाची आकडेवारी
मतदान प्रक्रिया सुरु झाल्या नंतर शनिवारी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत ५.६१ टक्के इतक मतदान झालेले होते. या मध्ये १० हजार ५९० पुरुष तर ५ हजार ४४४ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. त्या नंतर ७.३० ते ११.३० या वेळेत ५० हजार ५४१ पुरुष आणि महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला त्यामुळे मतदानाचा टक्का १७.६८ वर पोहचला होता. दुपारी दीड वाजे पर्यंत ९३ हजार ६३ मतदारांनी मतदान केल्याने ३२.५६ टक्के इतके मतदान झाले होते. पुढे दुपारी साडेतीन वाजे पर्यंत १ लाख ३७ हजार ८९८ मतदारांनी आपला हक्क बजाविल्याने सहाजिकच ४८.२५ टक्के इतके मतदान झाले होते. त्यामुळे मतदान संपेपर्यंत साधारणपणे ५० ते ५५ टक्के इतके मतदान होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
———————   
चौकट : ( तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विशेष लढती ) 
पंढरपूर तालुक्यातील वाखरी गटातून भाजपकडून मोनिका काळे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मयुरी बागल यांनी एकमेकांसमोर आव्हान उभे केले आहे. मोनिका काळे यांच्या विजयासाठी भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे यांनी या ठिकाणी ताकत पणाला लावली होती. तर मयुरी बागल यांच्या विजयासाठी आमदार अभिजित पाटील यांनी सर्वस्व पणाला लावल्याचे दिसुन आले. गोपाळपूर गटात भाजपकडून दुर्गा अंकुशराव यांनी तगडे आव्हान तयार केले असून शिवसेना शिंदे गटाच्या प्रियांका अशोक परांडे यांनी सुध्दा प्रचारात चांगली मुसंडी घेतली होती.त्यामुळे या लढतीकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कासेगाव गटात भाजपचे हरी गावंधरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संजय वाघमारे व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे व्यंकटराव भालके अशी लढत झाली आहे. त्यामुळे या लढती मध्ये कोण बाजी मारणार याबद्दल देखील उत्सुकता आहे. करकंब व भोसे गटातसुद्धा एकास एक उमेदवार असून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी याठिकाणी विशेष लक्ष केंद्रित केले होते त्यामुळे विजयश्री कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता आहे.
——————-
चौकट : ( आदर्श मतदान केंद्रावर उत्साह ) 
तालुक्यात वाखरी येथे मतदान केंद्र क्रमांक १५८ आदर्श महिला मतदान केंद्र तर टाकळी येथील मतदान केंद्र क्रमांक २४० येथे आदर्श मतदान केंद्राची स्थापन करण्यात आली होती. या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांचा विशेष उत्साह दिसून आले. या बरोबरच कासेगाव येथील मतदान केंद्र क्रमांक २८५ (निकम वस्ती) हे मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्र  म्हणून जाहीर करण्यात आलेले होते मात्र त्या ठिकाणी देखील आज मतदान प्रक्रिया शांततेमध्ये पार पडली.
——————-
चौकट :  ( तालुक्यातील गट आणि गणांची नावे ) 
तालुक्यातील करकंब, भोसे,रोपळे, गोपाळपूर, वाखरी, भाळवणी, लक्ष्मीटाकळी, आणि कासेगांव हे जिल्हा परिषदेचे आठ गट तर उंबरे, करकंब, भोसे, गुरसाळे, रोपळे, सुस्ते,पुळुज,गोपाळपूर,वाखरी,पटवर्धनकुरोली, भाळवणी, पळशी, लक्ष्मीटाकळी, खर्डी, कासेगांव आणि सरकोली असे पंचायत समितीचे सोळा गण आहेत.
———————–
फोटोओळी : पंढरपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी तालुक्यातील गादेगाव, कोर्टी, भंडीशेगाव, वाडीकुरोली आणि भाळवणी येथे शनिवारी दुपार नंतर मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी झालेली दिसत होती.  

Post Views: 17
Previous Post

आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू करंडक टी-२० क्रिकेट; आरोग्य विज्ञान, सावित्रीबाई फुले, डॉ. आंबेडकर मराठवाडा व शिवाजी विद्यापीठ उपांत्य फेरीत

Next Post

प्रेमप्रकरणातून तरुणाने घेतला गळफास

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

प्रेमप्रकरणातून तरुणाने घेतला गळफास

ताज्या बातम्या

20 हजार लाडू अन रक्तदान शिबीरासह साजरा झाला प्रकट दिन#public #marathinews #solapurnews #viral #viral

February 8, 2026

मोहोळजवळील एका ढाब्यावर रात्री ११ वाजता दोन ईव्हीएम मशीन आढळून आल्याची घटना समोर आली आहे.#public

February 8, 2026

२० हजारबलाडू वाटप अन रक्तदान शिबिरासह साजरा झाला प्रकट दिन..#public #marathinews #solapurnews #viral

February 8, 2026

आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केली खा. मोहिते पाटलांचा आरोप.#marathinews #public #viral #aajsolapur

February 8, 2026

प्रिसिजन संगीत महोत्सव सतार स्वराची सजली मैफिल.#public #marathinews #solapurnews #viral #aajsolapur

February 8, 2026

बसवण्णाच्या चबुतरासह पुतळ्याचेही दुरुस्ती काम सुरू#public #marathinews #solapurnews #mh13 #viral

February 8, 2026

शासकीय चित्रकला ग्रेड स्पर्धेत युनिक इंग्लिश मीडियम स्कूलचे घवघवित यश

February 8, 2026

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त पुस्तके वाटप

February 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0666225

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697